Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे वृक्षारोपणासाठी महिलांचा पुढाकार

pachora 2

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळातर्फे हरीगीरी बाबानगर परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी महिलांनी पुढाकार घेत लिंब, चिंच, करंज आदी जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा पाटील, लता जाधव, अनिता शर्मा, प्रदीप राजपूत, वीरेंद्र राजपूत, प्रताप भोसले, धर्मराज बच्छे, प्रशांत राजपूत, विजय वेळे, विजय आगोणे, रामेश्वर बोरसे, राजेंद्र कुमावत आदी उपस्थित होते.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असून आज पर्यावरणाची समस्या संवेदनशील बनली आहे. मानवाने प्रगती साधत असताना पर्यावरणाच्या संतुलनाचा कोणताही विचार न करता अपरिमित असे नुकसान केले आहे. याचे दुष्परिणाम पाहता पर्यावरणाचे संतुलित कसे राखता येईल याचा विचार करण्याची आज वेळ आली असल्याचे स्मिता बच्छाव यांनी सांगितले तर मानवासोबत सजीवांचे अस्तित्व आबाधित राखायचे असेल तर मानवाने वृक्षाला आपला मित्र बनवून पर्यावरणपूरक जीवन पदधतीचा अवलंब केला पाहिजे. यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती तितकीच महत्वाची असल्याचे सुचित्रा पाटील यांनी सांगितले.यावेळी परीसरातील नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Exit mobile version