Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे रा.काँ.चे उमेदवार दिलीप वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

pachora dilip wagh news

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पाचोरा शहरातून मिरवणूक काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करत शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन केले.

सुरूवातीस पाचोरा शहरातील राजीव गांधी टाऊन हॉल समोरील मानसिंगका मौदानात जोरदार सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गफ्फार मलीक, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराती, प्रसिध्द वक्ते प्रा.यशवंत गोसावी यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version