पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे “युवक जोडो व संपर्क अभियान”

पाचोरा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आजपासून “युवक जोडो व संपर्क अभियान” राबवण्यात येत अभियानाची नियोजन बैठक नगरदेवळा जि. प. गटात पार पडली. 

आज २२ वर्षांपूर्वी लावलेल्या एका छोट्या रोपट्याच्या स्वरूपात लावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वटवृक्ष झालेला आहे. म्हणून या वर्धापनदिनानिमित्त पक्षसंघटन मजबूत व्हावं व जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या माध्यमातून दिलेलं विविध क्षेत्रातील योगदान तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावं म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस माध्यमातून आजपासून “युवक जोडो व संपर्क अभियान” राबवण्यात येत आहे. यानिमित्त या अभियानाची नियोजन बैठक नगरदेवळा जि. प. गटात पार पडली. यावेळी बूथ कमिट्याचे “वन बूथ, टेन युथ” ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडलेल्या संकल्पेच्या यशस्वीतेसाठी ही चर्चा झाली व त्याअंतर्गत बूथ कमिट्या सक्षम करण्यासंदर्भात निर्धार करण्यात आला. माजी आमदार दिलीप वाघ व गटनेते संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी तालुका अध्यक्ष विकास पाटील उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक योगेश महाजन यांनी केले. सदर बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष विलास सोनवणे, किसान सेल चे तालुका अध्यक्ष दिपक पाटील, पंकज गढरी, जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक अभिजित पवार, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाचोरा शेतकी संघाचे व्हा चेअरमन रामधन परदेशी, सागर अहिरे (नेरी), राष्ट्रवादी युवकांचे जिल्हा संघटक उमेश एरंडे, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा सचिव सचिन शिंदे, राजू महाजन, सुरेश मणियार, नेरी येथील सरपंच सचिन पाटील, निपाने गावचे सरपंच रोशन पाटील, वडगाव मुलाने चे सरपंच राजेंद्र पाटील, वडगाव ग्रा. प. सदस्य आबासाहेब वाघ, युवा नेते शुभम महाजन, योगेश पाटील, रेहमत पठाण, रवी पाटील (दिघी), सुरेश बागुल, कार्यक्रमाचे सुत्र संचलन योगेश महाजन यांनी केले तर आभार अशोक सोंन्नी यांनी मानले. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content