Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा खून प्रकरण : तरूणाचा भोसकून खून करणाऱ्या अजून तिघांना अटक

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरातल एका २३ वर्षीय तरूणाचा क्षुल्लक कारणावरून चाकू भोसकून खून केल्याची घटना उघडकीला आलीा होती. या गुन्ह्यातील उर्वरित तीन जणांना अटक केली आहे. तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात यापुर्वी पाच जणांना अटक केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, ३० रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुर्‍हानी इंग्लिश मेडियम स्कूल च्या आवारात तरुणांच्या झालेल्या भानगडीत भुषण नाना शेवरे (वय-२३) रा. दुर्गा नगर, पाचोरा या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात  लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील आणि पवन (पुर्ण नाव मा‍हित नाही) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचोरा पोलीसांनी संशयित आरोपी  लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील यांना सोमवारी ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. तर आज १ फेब्रुवारी उर्वरित आरोपी राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील आणि पवन (पुर्ण नाव मा‍हित नाही) यांना अटक केली आहे. आज अटक केल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.  सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता आर. के. माने यांनी काम पाहिले आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस हेड कॉन्स्टेबल  दिपक (आबा) पाटील व कोर्ट केसवाच म्हणुन पोलिस नाईक विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version