Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व तालुका विधी सेवा समिती व पाचोरा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने उद्या १२ रोजी पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे, दाखल पुर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी सदरच्या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा न्यायालयातर्फे तालुक्यातील वडगाव टेक, अंतुर्ली, आर्वे, बिल्दी या गावांसह पाचोरा शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रीय लोकन्यायालया बाबत जनजागृती करण्यात आली आहे. या लोक न्यायालयातील फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्टच्या कलम १३८ खालील दाखल प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, अपघात व्यायाधिकरणा बाबतची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयका बाबतीची प्रकरणे (तडजोडीस अपात्र प्रकरणे वगळुन), वैवाहिक वादा बाबतची प्रकरणे, अशा स्वरूपाची प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात येणार आहे.

परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिवराळे यांनी केले आहे.

Exit mobile version