Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत मजूर ठार

पाचोरा प्रतिनिधी | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील कुर्‍हाड येथील मजूर जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कुर्‍हाड खुर्द येथील सुरेश गणपत देशमुख (वय – ४०) हे गेल्या तीन वर्षांपासून पाचोरा येथील एका व्यापार्‍याकडे शेती कामासाठी सायकलवर ये – जा करत होता. रविवारी सायंकाळी ६:३० वाजता त्यांची सुट्टी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सायकलवरून घरी जाणेसाठी निघाला होता. दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान बिल्दी धरणावरुन जात असतांना जळगाव कडुन एक अज्ञात चारचाकी वाहन भरधाव वेगाने येवुन त्यांचेवर समोरुन येवुन धडकले. दरम्यान देशमुख यास धडक बसल्याने अज्ञात वाहनाच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचे जागीच निधन झाले.

दरम्यान गावातीलच माजी ग्रामपंचायत सदस्य विलास चव्हाण हे पाचोर्‍याहुन घरी जात असतांना त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सुरेश देशमुख यांाना ओळखल्याने तात्काळ शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यानंतर अरुण पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचे राहुल बेहरे यांना माहिती दिली. बेहरे यांनी रुग्णवाहिकेसोबत जावुन मयताचे शव ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनेची माहिती वार्‍यासारखी कुर्‍हाड गावात मिळताच ग्रामस्थांनी रूग्णालयात धाव घेतली.

मयत सुरेश देशमुख यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ, एक बहिण असुन मयत देशमुख यांचेवर राहतेगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Exit mobile version