Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजचा दिवस त्यांचा, उर्वरित ३६४ दिवस आमचे : किशोरआप्पांचा इशारा !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज पाचोर्‍यातील सभेवरून वातावरण तापले असतांना शिंदे गटाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आजचा दिवस हा त्यांचा असला तरी उर्वरित दिवस आमचे असल्याचे वक्तव्य केले आहे.

आज पाचोरा येथे उध्दव ठाकरे यांची सभा होण्यापूर्वीच मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचे यातून दिसून आले आहे. यात ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी आज अतिशय आक्रमक भूमिका घेत गुलाबभाऊंचा मुखवटा घालून पाचोर्‍याकडे कूच केले. तथापि, सभेच्या आधीच पोलिसांनी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रोखले. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार किशोरआप्पा पाटील हे देखील होते.

आमदार किशोरआप्पा पाटील यांनी याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ठाकरे गटावर जोरदार टिका केली. आमच्यावर केलेली टिका खपवून घेतली जाणार नाही. ”आजचा दिवस हा त्यांचा असला तरी पुढील ३६४ दिवस आमचे आहेत. वेळ येईल तेव्हा आम्ही पाहून घेऊ !” असा सूचक इशारा आमदार किशोर पाटील यांनी याप्रसंगी दिला.

Exit mobile version