Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा तहसील कार्यालयासमोर हरीभाऊ पाटील यांचे उद्यापासुन उपोषण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ग्रामीण रूग्णालयात चुकीच्या उपचारामुळे बालक दगावल्याने संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ पाटील हे ४ जुलैपासून पुन्हा उपोषण सुरू करत आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या चुकीच्या उपचारामुळे दि. १० मे २०२२ रोजी नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाला पावडरचे दुध पाजल्यामुळे मयत बाळाची प्रकृती खालावल्यामुळे सदर बाळाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. यातून बाळाचा झाला मृत्यू आहे. या बाळाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी दिनांक हरीभाऊ पाटील यांनी दि. १३ जुन २०२२ रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात केली होती.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक जळगांव यांनी संबंधीत उपोषण तुर्त १० दिवस स्थगित करावे असे लेखी पत्र त्यांच्या कर्मचार्‍याच्या हस्ते देवुन विनंती केल्यामुळे हरीभाऊ पाटील यांनी सुरू असलेले आमरण उपोषण तुर्त १० दिवसांसाठी स्थगित केले होते. परंतु संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक यांनी १० दिवसांच्या केलेल्या विनंती नुसार कोणतीही योग्य कार्यवाही केली नाही आणि तसा १० दिवसांत कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याने तसेच हरीभाऊ पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांना १० दिवसाची म्हणजेच दि. ३ जुलै २०२२ पर्यंत दिलेली वाढीव मुदत संपली तरीसुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांनी मयत बाळाच्या मृत्यूची कोणतीही दखल घेतली नाही. आणि दोषी कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई केली नाही. म्हणून आज दि. ४ जुलै पासुन बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील हे पाचोरा तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

Exit mobile version