Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. उन्मेष पाटील यांच्या गिरणा परिक्रमा यात्रेतील चौथ्या टप्प्यास प्रारंभ

पाचोरा प्रतिनिधी | खासदार उन्मेष पाटील यांच्या गिरणा परिक्रमा यात्रेतील चौथ्या टप्प्यास आज तालुक्यातील भातखंडे येथून प्रारंभ झाला असून आज ते भातखंडे ते पूनगाव अशी पदयात्रा करणार आहेत.

गिरणा नदीचे पुनरूज्जीवन व्हावे, यातील वाळू चोरीसह अन्य सर्व गैरप्रकारांना आळा बसावा आणि बलून बंधार्‍यांना परवानगी मिळावी या मागण्यांसाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी गिरणा परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. कानळदा येथील महर्षी कण्वाश्रमाजवळ गिरणेचे पुजन करून यास जलपुरूष राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत प्रत्येक शनिवार आणि रविवारी खासदार पाटील हे आपल्या सहकार्‍यांसह पदयात्रा काढून गावोगावी जनजागृती करत आहेत.

आज गिरणा परिक्रमा यात्रेतील चौथा टप्पा सुरू झाला असून याच्या अंतर्गत ते पाचोरा तालुक्यातील भातखंडे ते पूनगावच्या दरम्यान पदयात्रा काढत आहेत. आज सकाळी भातखंडे येथे गिरणी मातेचे पूजन करून त्यांनी यात्रेस प्रारंभ केला आहे. या मार्गावरील गावांमध्ये ते ठिकठिकाणी जनजागृती करत आहेत. या पदयात्रेत त्यांच्या सोबत भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Exit mobile version