Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे पाचोर्‍यात लसीकरण सुरळीत

पाचोरा प्रतिनिधी । येथे लसीकरणाच्या नियोजनाचा फज्जा उडाल्यानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी प्रयत्न केल्यामुळे आजपासून सुरळीत लसीकरण सुरू झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा शहरातील एकच केंद्र पंचायत समिती सभापती निवासस्थानी वॅक्सिन चे उभारण्यात आले आहे. या केंद्रात दैनंदिन १०० लोकांनाच कोरोना लस दिली जाते. लसींचा साठा उपलब्ध असतांना दुपारी केंद्र बंद केले जात होते. गेल्या दोन दिवसांपासून कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना संपर्क केला असता त्यांनी लसी उपलब्ध आहेत आणि लाभार्थी असतील तर त्यांना शेवटी च्या लसी संपेपर्यंत दिल्याच पाहिजेत असे सांगितल्यावर अखेर दोन दिवसां पासून सकाळी पाच वाजे पासून आलेल्या जेष्ठ नागरिकांना कोशील्ड लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरीक खुप संतप्त झाले होते.

याची दखल घेऊन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी नागरिकांची समजूत काढली. यानंतर महसूल अधिकारी आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातुन जवळपास चारशेहून अधिक लोकांना लसीकरण झाले. लसीकरण मोहीमेत जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी यांनी स्थानिक लसीकरण केंद्र जास्तीत जास्त सुरु करावे अशी मागणी कॉग्रेस ने केली असून दि. ८ रोजी बाहेरपुरा भागातील नगर परिषद च्या दवाखान्यात १८ ते ४४ वर्षे वयाच्या लसीकरणाला सकाळी ९ वाजता सुरूवा झाली आहे. तर अजुन एक केंद्र भडगाव रोड परिसरातील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालया जवळ तातडीने सुरु करावे अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांच्या कडे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. लसी ज्या संख्येने येतील त्या तात्काळ दिल्या जाव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे.

लसीकरण मोहीमेच्या यशस्वीसेसाठी परीचारीका ज्योत्स्ना पाटील, भारती देशमुख, कॉग्रेस सोशल मीडिया चे राहुल शिंदे, कल्पेश येवले, जगदीश पाटील, प्रमोद पाटील आदींनी सहकार्य केले आहे.

Exit mobile version