Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकर्‍यांचे ५० लाख बँकेत पडून : परत न केल्यास कॉग्रेसचा आंदोलनाचा इशारा (व्हिडिओ)

पाचोरा, प्रतिनिधी ।   स्टेट बँकेची थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी  असलेल्या योजनेचा बँकेच्या नियोजना अभावी बोजवारा उडाला असून तत्काळ कर्जफेडचे दाखले द्यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा कॉग्रेसने निवेदनाद्वारे दिला आहे. 

भारतीय स्टेट बँकेने डिसेंबर – २०२० मध्ये ऋण समाधान नावाची थकीत शेतकऱ्यांसाठी योजना आणली होती. या योजनेबाबत स्थानिक बँक अधिकारी यांनी जवळपास २० हुन अधिक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून या योजनेत बचत खात्यात कर्ज फेडण्यासाठीची ठरलेली रक्कमचा भरणा करायला भाग पाडले असता शेतकऱ्यांची ही रक्कम जवळपास ५० लाखाहुन अधिक शेतकऱ्यांच्या बचत खात्यात भरले गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि बँकेचे आर्थिक नुकसान होत आहे. सदर रक्कमेला सहा महिने झाले तरी देखील सबंधित शेतकर्‍यांना अद्यापही कर्जफेडीचा दाखला मिळाला नाही, त्यामुळे आज येथील कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, यांच्या नेतृत्वाखाली बँक मॅनेजर मच्छिंद्र दुधल यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, युवक काँग्रेसचे ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शाखा व्यवस्थापक दुधल यांच्याशी चर्चा करण्यात आला.  मॅनेजर यांनी शेतकऱ्यांचे आणि बँकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मान्य केले, मात्र टेक्निकल समस्या असल्याचे सांगितले. यावेळी कॉग्रेस पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांना लवकर कर्जफेडीचा दाखला न दिल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

Exit mobile version