Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा – भडगाव रोटरी क्लब पदग्रहण समारंभ उत्साहात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगावचा पदग्रहण समारंभ नुकताच भडगाव रोडवरील आशिर्वाद हाॅलमध्ये उत्साहात संपन्न झाला.

यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल रो. मोहन पालेशा व उपप्रांतपाल रो. विकास पाचपांडे उपस्थित होते. रोटरी वर्ष – २०२२-२३ च्या अध्यक्षपदी रो. डॉ. अमोल जाधव तर सेक्रेटरीपदी रो. डॉ. गोरख महाजन यांची निवड करण्यात आली.

रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो. डॉ.बाळकृष्ण पाटील व सेक्रेटरी रो. डॉ. पंकज शिंदे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना रोटरी कॉलर, चार्टर, हॅमर व पिन देऊन पदभार सोपवला. माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली. मावळते सेक्रेटरी रो.डॉ. पंकज शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

मावळते अध्यक्ष रो. डॉ बाळकृष्ण पाटील यांनी गतवर्षाच्या कामगिरीचा आढावा उपस्थितांच्या समोर सादर केला. रोटरी क्लब चे नूतन अध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांनी आगामी वर्षाचा संकल्प व संभाव्य उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपप्रांतपाल रो. विकास पांडे यांनी प्रांतपाल रोटेरियन डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या संदेशाचे वाचन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. मोहन पालेशा यांनी ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर आपले मनोगत व्यक्त केले. या पदग्रहण समारंभ प्रसंगी रोटरी क्लब पाचोरा – भडगाव ची २० सदस्यीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावर्षी नवीन १० सदस्यांनी रोटरी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. योगेन्द्रसिंह मोरे प्रा. राजेंद्र चिंचोले व वैशाली सूर्यवंशी या मान्यवरांचा आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पत्रकार व रोटरी पदाधिकाऱ्यांच्या परिवाराचाही आयोजकांतर्फे सन्मान करण्यात आला.

रो.प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सेक्रेटरी रो. डॉ. गोरखनाथ महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रो. जवाहर संघवी, रो. भरत सिनकर, रो. निलेश कोटेचा, रो. निरज मुनोत, रो.अतुल शिरसमणे, रो. रो. शैलेश खंडेलवाल, रो. रावसाहेब पाटील, रो. प्रदीप पाटील, रो. प्रशांत सांगळे, रो. नरेश गवांदे, रो. डॉ. प्रशांत पाटील, सुयोग जैन यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version