Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाची हत्या करणार्‍या पाच जणांना अटक : तिघांचा शोध सुरू

पाचोरा, प्रतीनीधी | मोटारसायकलचा कट लागण्याच्या वादातून तरूणाची हत्या करणार्‍या टोळक्यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, दि ३० रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुर्‍हानी इंग्लिश मेडियम स्कूल च्या आवारात तरुणांच्या झालेल्या भानगडीत एका २३ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन खून करण्यात आला. या घटनेत भूषण नाना शेवरे (वय – २३) रा. दुर्गा नगर, पाचोरा याचा मृत्यू झाला.

मोटारसायकलचा कट लागण्याच्या वादातून भूषण शेवरे याच्यावर तरूणांच्या एका टोळक्याने हल्ला चढविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील आणि पवन पाटील (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुरनं ४२/२०२२ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील आणि अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version