Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. संतोष पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्कार

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील गोराडखेडा येथील रहिवासी सुप्रसिध्द व्याख्याते व लेखक डॉ. संतोष पाटील (गोराडखेडेकर) यांना प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन अ‍ॅन्ड एच. डी. एस. दिल्ली यांच्यातर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील रहिवासी सुप्रसिध्द व्याख्याते व लेखक डॉ. संतोष पाटील (गोराडखेडेकर) यांना प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन अ‍ॅन्ड एच. डी. एस. दिल्ली यांच्यातर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. पाटील हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकरदन येथे कार्यरत शिक्षक आहेत. कोरोना काळात त्यांनी लोकांच्या सकारात्मक भावना जागवण्यासाठी व या भयावह परिस्थितीमध्ये आशावादी किरण निर्माण करण्यासाठी विभिन्न दैनिक वृत्तपत्रात लेख लिहिण्याचे कार्य केले. यात त्यांनी कोरोना काळ व मुलांचे शिक्षण, शेतकरी बांधव विद्यार्थी, व्यापारी व सर्व समाजाला मार्गदर्शक व मदत होईल अशा लेखांचे लिखाण केले. या काळात त्यांनी आतापर्यंत पंचवीस विभिन्न विषयांवरती लेख लिहिले. त्याचबरोबर त्यांनी समाजातील गोरगरीब घटकांना घरी तयार करून भोजन वाटपाचे कार्य केले. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी वंदना पाटील यांची फार मोठी साथ मिळाली.

याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे महासचिव शेख उबेद शेख करामत यांच्यातर्फे व इतर मान्यवर यांच्यातर्फे ऑनलाईन पध्दतीने शाल, श्रीफळ व ई – सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी हा पुरस्कार मला नसून माझ्या विभिन्न लेखांना प्रसिध्दी देणार्या पत्रकार बांधवांचा व संपादकांचा आहे. असे बोलून दाखवले व त्या सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version