Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा 

जळगाव प्रतिनिधी । चिंचोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, चिंचोली येथील काजल सुनील गोसावी यांचा मध्यप्रदेशातील भोपाळ येथील सुनील अशोक गोसावी यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले पार पडल्यानंतर पतीसह सासरच्यांनी काजल हिच्याकडे तिने माहेरुन पाच लाख रुपये आणावेत व संसारपयोगी साहित्य आणावे अशी मागणी केली. याच कारणावरुन पतीसह सासरच्यांनी काजल हिचा दोन वषापर्यंत वेळावेळी मानसिक तसेच शारिरीक छळ केला. छळ असह्य झाल्याने काजल ह्या माहेरी निघून आल्या. व याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बुधवारी काजलचे पती सुनील अशोक गोसावी, अशोक प्रल्हाद गोसावी, हिराबाई अशोक गोसावी, विद्या सचिन गोसावी, वर्षा पुरूषोत्तम पाटील सर्व रा गोविंदपुरा, हुजरआण्णानगर, भोपाळ, मध्यप्रदेश या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी हे करीत आहेत.

Exit mobile version