Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात हिंदी दिन साजरा

WhatsApp Image 2019 09 14 at 4.34.42 PM

जळगाव, प्रतिनिधी | ” निज भाषा का नही गर्व जिसे , क्या प्रेम देश से होगा उसे | वही वीर देश का प्यारा है, हिंदी ही जीसका नारा है | ” केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर व ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हिंदी ही आपल्या भारत देशाची शान आहे. आपली ओळख आहे व या भाषेमुळेच आपण सर्व विभिन्न प्रांताचे लोक एकसंघ आहोत. आपण आपल्या राष्ट्रध्वजाविषयी जो मान राखतो तोच मान आपल्या राष्ट्रभाषेविषयी राखावा. हिंदी बोलण्याचा आणि ऐकण्याचा सदैव प्रयत्न करावा. अशा शब्दात उपशिक्षिका रोहिणी चौधरी यांनी हिंदीचे महत्व विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अतुल पाटील यांनी केले तर आभार वर्षा राणे यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका रेखा पाटील ,एन. बी.पालवे , योगेश भालेराव , डी. बी. चौधरी , बिपीन झोपे, प्रतिभा लोहार आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version