प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयात नृत्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय येथे नृत्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

केसीई नृत्य विभागाच्या माध्यमातून सदर प्रशिक्षण दिले जाणार असून त्यात लोकनृत्य , वेस्टर्न डान्स , सोलो डान्स , समूह नृत्य असे विविध नृत्य प्रकार शिकवले जाणार आहेत. याप्रसंगी केसीई सोसायटीच्या नृत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण केले.

कार्यक्रम प्रसंगी केसीई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर , शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी , केसीई नृत्य विभाग प्रमुख अजय शिंदे , मुख्या.रेखा पाटील , मुख्या.दिलीपकुमार चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले तर आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले.

Protected Content