Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पी. टी. उषांसह चौघांना राज्यसभेत संधी

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फ्लाईंग क्वीन पी. टी. उषा आणि संगीतकार इलैया राजा यांच्यासह चौघांची राज्यसभेवर वर्णी लागणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

धावपटू पी टी उषा,  प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली असून आज पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली. उषा यांच्याबद्दल ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पीटी उषा त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वत्र ओळखल्या जातात, परंतु नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे.

इलयाराजा यांच्याबद्दल पंतप्रधान म्हणाले की, “त्यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांची कामे अनेक भावनांचे सुंदर चित्रण करतात. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. वीरेंद्र हेगडे हे समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची आणि आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले महान कार्य पाहण्याची संधी मिळाली. ते संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करतील.” अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली आहे. तर विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध पटकथालेखक आहेत.

Exit mobile version