Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मु.जे. महाविद्यालतयात ‘ड्रीमी आईज रिसोर्स सेंटर’ उद्घाटन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । एम.जे. महाविद्यालयात महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे ड्रीमी आईज रिसोर्स सेंटर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षा अभियानचे समन्वयक वसीम शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी  परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. जे.एन. चोधरी, सर्व शिक्षा अभियानचे रिसोर्स शिक्षक समाधान माळी, वृषाली चोधरी, नेब चे सहसचिव सुनील दापोरेकर, सेंटरचे डॉ.व्ही. एस. कंची आदि उपस्थित होते. या सेंटरमधे विद्यार्थ्यांना  मोबाईल संबंधी विविध प्रोग्राम, कॉम्पुटर इन्फोर्मेशन प्रोग्राम, तसेच विविध लर्निंग कोर्सेस घेतले जातात. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सेंटरचा लाभ घेतला पाहिजे असे डॉ. कंची यांनी प्रास्ताविकात सांगितले.  यावेळी प्रा. मनोज पांडे, संतोष मनुरे, प्रा. संदीप वळवी, भारत वाळके, श्रीमती राजहंस,ललिता निकम, समीर पाटील, संजय जुमनाके, केतकी सोनार आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version