Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओवेसी म्हणतात ‘ठाकरे व शिंदे ही तर राम-शाम की जोडी’ !

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे ठाकरे आणि शिंदे गटांमधील वैमनस्य टोकाला पोहचले असतांनाच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र वेगळेच तर्कट मांडले आहे.

मुंब्रा येथील जाहिर सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यातील राजकारण्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले. त्यांनी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेचे दोन तुकडे झाले तर मला मीडियावाल्यांनी विचारलं की, तुम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटत नाही का? पण मला मीडियावाल्यांना विचारायचं आहे की, जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर कत्तली होत होत्या तेव्हा त्यांना सहानुभूती वाटली नाही. जेव्हा टाडाच्या कायद्यांतर्गत लोकांना तुरुंगात टाकलं गेलं तेव्हा त्यांना सहानुभूती वाटली नाही. हे तुम्ही विसरलात का? मी कधीही विसरणार नाही

ओवेसी पुढे म्हणाले की, शिंदे आणि ठाकरे यांची राम आणि श्यामची जोडी आहेत, हे कधीही एकत्र येऊ शकतात. शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे? शिवसेना कधीपासून धर्मनिरपेक्ष झाली. राहुल गांधी ओरडून सांगतील का, की शिवसेना धर्मनिरपेक्ष झाली ! जेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे नेते होऊ शकतात. उद्धव ठाकरे केवळ आपल्या वडिलांच्या पुण्याईवर नेता होऊ शकतात. तसेच एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस नेते होऊ शकतात. मग महाराष्ट्रातील मुस्लिम व्यक्ती शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यासारखे होऊ शकत नाहीत का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Exit mobile version