Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हा तर माकडांचा खेळ ! : ओवेसींची टीका

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात सत्तांतरासाठी सुरू असलेल्या घडामोडी म्हणजे माकडांचा खेळ असल्याची शेलक्या शब्दांमध्ये टीका एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाते संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे शिंदे गटासोबत हातमिळवणी करून भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार की महाविकास आघाडीचे सरकार तरणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच विविध पक्षाच्या नेत्यांनी यावर भाष्य करण्यास देखील सुरूवात केलेली आहे. या अनुषंगाने एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या स्थितीवर भाष्य केले आहे.

या संदर्भात ओवेसी म्हणाले की, सध्या आम्ही विकासावर लक्ष केंद्रित केलंय. शिवसेनेची ही अंतर्गत बाब आहे, याप्रकरणी महाविकास आघाडीनं विचार करावा, असं त्यांनी म्हटलंय. ओवैसी पुढं म्हणाले, महाराष्ट्रात जे काही चाललंय, ते माकडांच्या खेळासारखं आहे. माकडं जशी एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर उड्या मारतात, त्याचप्रमाणं शिवसेनेचे बंडखोर आमदार इकडून तिकडे उड्या मारत आहेत, अशा शेलक्या शब्दांमध्ये त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Exit mobile version