Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे उद्या ओवेसींची जाहिर सभा

 

फैजपूर प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभा उद्या दि.१३ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

फैजपूर येथील सावदा रोडवरील कबरस्थान शेजारील मिल्लत नगर येथे ही सभा घेण्यात येणार आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील खा.ओवेसी प्रेमींनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रचार समिती प्रमुख अशरफ तडवी आणि कार्यालय सचिव सुमित बोदडे यांनी केले आहे.

Exit mobile version