Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना करतेय ‘राजकीय भांगडा’ – ओवेसींनी केली टीका

asaduddin owaisi

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन (CAB) शिवसेनेचे भांगडा राजकारण सुरु आहे, अशी बोचरी टीका एआयएमआयएमचे खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करत त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तेव्हा सेनेने सेक्युलर हा शब्द त्यांच्या किमान समान कार्यक्रमात लिहिला. मात्र हे बिल धर्मनिरपेक्षतेविरोधात आहे. त्यामुळेच शिवसेनेने या विधेयकावरुन भांगडा पॉलिटिक्स सुरु आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत बहुमताने मंजुर झाले, यावेळी शिवसेनेनेही याला पाठींबा दिला होता. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचे असल्याने शिवसेनेने त्याला पाठींबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Exit mobile version