नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा एकुण ९९.३६ टक्के निकाल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलींचे कनिष्ठ महाविद्यालयात बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.

बारावी परिक्षेच्या निकालात महाविद्यालयाचा एकुण ९९.३६ टक्के निकाल लागला आहे. यात कला शाखा ९९ टक्के, वाणिज्य शाखा ९८.७९ टक्के आणि विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. यात कला शाखेतील  पुजा सोनवणे ही विद्यार्थीनी ७८.८३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली आहे.

कला शाखा

पुजा सोनवणे-७८.८३ टक्के, जागृती कुंभार ७५ टक्के, निकीता कोळी ७४.१७ टक्के, कल्याणी पाटील ७४ टक्के आणि हरीता देवेंद्र विसावे हीला ७३.३३ टक्के मिळाले आहे.

वाणिज्य शाखा

लिना सोनवणे -७७.६७ टक्के, नेहा पाटील-७५.१७ टक्के, जयश्री भोई ७४.१७, वैष्णवी गंजाळ ७२.८३ टक्के, लक्षिता पन्हाळे ७२.६७ टक्के

विज्ञान शाखा

रूचा वाणी-७५.८३ टक्के, जान्हवी देवरे-७४.८३ टक्के, नेहा पाटील-७२.५० टक्के, रूपाली सोनवणे-७२.५० टक्के, भाग्यश्री बडगुजर-७१.१७ टक्के, गायत्री पवार-७०.८३ टक्के आणि श्रृती खलसे -७०.८३ टक्के गुण मिळाविले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यीनींचा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी अभिनंदन केले आहे. याप्रसंगी प्राचार्या सी.एस.पाटील, उपप्राचार्य एस.एस. नेमाडे, उपमुख्यध्यापक एस.के. चोपडे, संस्थेचे शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी, ॲड. देवेंद्र विसावे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Protected Content