जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एकलव्य क्रिकेट अकादमीच्या तीन खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धांमध्ये के.सी.ई. सोसायटीच्या एकलव्य क्रिकेट अकादमी संचलित एकलव्य क्रीडा संकुलातील पवन पाटील, कृष्णा महाजन आणि अनुज पवार यांनी चमकदार कामगिरी केली.

यामध्ये कृष्णा महाजन व पवन पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे तर अनुज पवार ह्याने नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. पवन सुधीर पाटील ह्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेत एकूण ४०७ रन काढले या कामगिरीमुळे तो महाराष्ट्रातील १६ वर्षाआतील टॉप पाच फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने स्पर्धेतील १८४ धावांची सर्वोत्तम खेळी नांदेड संघाविरुद्ध खेळली. पवन पाटील हा नगरसेविका प्रतिभा सुधीर पाटील यांचा सुपुत्र असून ओरियन स्टेट बोर्डचा विद्यार्थी आहे. अनुज पवार ह्या खेळाडूने नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत संपूर्ण स्पर्धेत २१७ धावा केल्या.

पवन पाटील, अनुज पवार, कृष्णा महाजन हे खेळाडू गेल्या चार वर्षापासून सातत्याने एकलव्य क्रीडा संकुलात मुख्य प्रशिक्षक पंकज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. ह्या खेळाडूंच्या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी कौतुक केले. खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी पवन पाटील या खेळाडूस इंग्लिश विलो, अनुज पवार या खेळाडूस रबर स्टड शुज, व कृष्णा महाजन या खेळाडूस क्रिकेट गणवेश देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 

Protected Content