Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतापजनक : दोन सख्ख्या बहिणींना धमकी देत विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात शिक्षणासाठी राहत असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाठलाग करत फोनवरती धमकी आणि परिवाराला ठार मारण्याची धमकी देत दोघींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय तरुणी हे आपल्या लहान बहीण आणि कुटुंबासह वास्तव्याला आहे. दोन्ही बहिणी ह्या शिक्षणासाठी अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालय परिसरात राहतात. दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून संशयित आरोपी हर्षल हिम्मतराव पाटील रा. दहिवद ता.अमळनेर हा तरुणीचा पाठलाग करून घरातील सदस्यांना मारून टाकण्याची धमकी देत दोघींचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर दोघी बहिणींनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी हर्षल पाटील यांच्या विरोधात दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे हे करीत आहे.

Exit mobile version