Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

३३ लाखांच्या थकबाकीपोटी मुक्ताईनगरचे बी.एस.एन.एल कार्यालय महसूल प्रशासनाकडून सिल

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तहसील कार्यालयतर्फे ३३ लाख १६ हजार ६०० रुपयांच्या महसुली थकबाकीपोटी शासकीय कंपनी असलेल्या भारतीय संचार निगम लिमिटेड अर्थातच बी.एस.एन.एलच्या प्रमुख कार्यालयाला सील लावण्याची कारवाई आज करण्यात आली.

भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या अनधिकृत अकृषिक वापर सुरू असलेल्या मोबाईल टॉवर बाबत सन २०१० ते २०१६ या कालावधीतील अंतर्गत लेखा वसुली रक्कम १० लाख ८४ हजार ६०० रुपये व सन २०१६-१७ ते २०२१-२२ यादरम्यानची रक्कम २२ लाख ३२ हजारपर्यंतची रक्कम अशी एकूण ३३ लक्ष १६ हजार ६०० रुपये वसुली प्रलंबित आहे. सदरची रक्कम ही २२ मार्च २०२२ पर्यंत सरकार जमा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार कार्यालय सिल करण्याच्या कारवाईचे आदेश तहसीलदार श्वेता संचेती यांनी काढलेले होते. मात्र २२ तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचा महसूल शासनाकडे जमा न झाल्याने आज ही तडकाफडकी कारवाई करण्यात येऊन कार्यालय सिल करण्यात आले.

कारवाई प्रसंगी नायब तहसीलदार निकेतन वाळे, निवासी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, मंडळ अधिकारी किशोर तायडे, तलाठी महादेव दाणे आणि सोमनाथ बोरटकर यांनी ही कारवाई केली.

Exit mobile version