Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अस्थिरोग दिनानिमित्त जनजागरण अभियान सप्ताहाचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त जनजागरण अभियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील आयएमए हॉल येथे अस्थीरोग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार २७ रोजी पत्रकार परिषदेत घेतली. याप्रसंगी संघटनेचे सचिव डॉ. भूषण झंवर, विभाग प्रमुख डॉ.सुनील नहाटा, सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे व जनसंपर्क प्रमुख डॉ. विनोद जैन याची देखील उपस्थिती होती.

यावेळी सप्ताहात बुधवार ४ मे रोजी सकाळी ७ वाजता काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानात जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात  डॉ. ज्योती गाजरे, डॉ. मनीषा चौधरी,  डॉ. निरंजन चव्हाण, डॉ. पराग नाहटा यांचे योगा शास्त्र, गुडघेदुखी, हाडांचा ठिसूळपणा बचाव, आधुनिक जीवन शैली ही काळाची गरज आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आठवडाभर जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व सदस्य व रुग्णांच्या जनजागरणासाठी वैद्यकीय अधिकारी आणि विशेष तज्ञ यांचे कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

हा कार्यक्रम थेट ऑनलाईन पद्धतीने होणार असून यात डॉ. सुनील मारवाह, डॉ. पराग संचेती, डॉ. विजयकांत काकतकर, योगी सत्यानंद, डॉ. राजेंद्र अभ्यंकर, डॉ. मिलिंद पत्रे, डॉ. शैलेश पानगावकर यांच्यासह इतर मान्यवरांचे मार्गदर्शन व्याख्यान होणार आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Exit mobile version