Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भगवान परशुराम जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येत्या 3 मे रोजी ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाही १ मे रोजी भव्य मोटरसायकल रॅली व ३ तारखेला सायंकाळी ५ वाजेपासून शहरातील रथचौकातून शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. शोभायात्रेत संपूर्ण जिल्ह्यातील हजारो ब्राह्मण समाज बांधवांचा सहभाग यावेळी असणार आहे. ब्राह्मण समाजातील जवळपास ५० शाखा व भाषा असलेली समाज बांधव यादिवशी एकाच ठीकाणी येऊन उत्सव साजरा करणार आहे. कार्यक्रमासाठी सुमारे ५० कार्यसमित्या नियुक्त करण्यात आल्या असून सुमारे ४०० स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे उत्साहाने कार्य करीत आहे. यासाठी ढोल पथकाचा सराव सागरपार्क  याठीकाणी सुरु करण्यात आला आहे. लेझीमचा तासेचलाठी काठी दांडपट्टा,तलवार यांचे प्रशिक्षण शेखर कुलकर्णी घेत आहे.

१ मे रेाजी संध्याकाळी ५ वाजता संभाजी चौकापासून मोटरसायकल रॅलीची सुरवात होऊन बालगंधर्व खुले नाट्यगृह याठीकाणी समारोप होणार आहे. पारंपारीक वेशभुषेत यावेळी महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल. तर १ रोजी महाप्रसादाचे अयोजन रॅलीतील सहभागी समाजबांधवांसाठी करण्यात आली आहे. ३ रोजी भव्य शोभायात्रा रथचौक राममंदीर येथून काढण्यात येणार असून बालगंधर्व नाट्यगृह येथे समारोप तसेच सर्व समाजबांधवांसाठी ३ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर यादरम्यान शितपेयांची देखील विविध ठीकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

समस्त ब्राह्मण समाजाने वर्षातून एकत्र यावे या उद्देशाने बहुभाषिक ब्राह्मण संघ कार्य करते. यासाठी सर्व समाजबांधवांनी या काार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी अध्यक्ष अजित नांदेडकर, महिला अध्यक्ष मनिषा दायमा, नियोजन समिती प्रमुख श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, सुधा खटोड स्वातीताई कुलकर्णी  यांचे मार्गदर्शन मिळत अाहे. तर यासाठी राजेश नाईक, मोहन तिवारी, पंकज पवनीकर, पियुष रावळ, वृषाली जोशी, प्रियंका त्रिपाठी, गोपाल पंडीत, स्वप्नगंधा जोशी, महेश दायमा, सुरज दायमा, महेंद्र पुरोहित, राजेश शर्मा, शेखर कुळकर्णी, किसन अबोटी, प्रकाश शर्मा, सौरभ चौबे, वैशाली नाईक, वृंदा भालेराव, किर्ती दायम, सविता नाइक, अनुराधा कुळकर्णी, वर्षा पुरोहित, अॅड. सुहास जोशी, कमलाकर फडणीस, डॉ. विशाल शर्मा,  संजय कुलकर्णी अक्षय जोशी, विनोद रामावत, दिपक बोरायडा, गोपाल पंडीत, सुरेश शर्मा, सतिष दायमा, महावीर पंचारीया, केदार पंचारीया, आनंद तिवारी, नितीन बापट, वैशाली नाईक छाया त्रिपाठी, रोहीणी कुळकर्णी, केदार जोशी, दिपक महाजन, विकास शुक्ल गुरुजी, लक्ष्मीकांत त्रिपाठी, अमोल जोशी, शुभदा कुळकर्णी, साधना दामले, श्रीरंग पुराणकर, अनंतराव जोशी आदी परीश्रम घेत आहे.

ब्राह्मण समाजाने संघटित होण्याचे आवाहन

ब्राह्मण समाजावर वारंवार काही समाजातील उच्च पदस्थ व्यक्तींकडून नको ते बोलले जात आहे. ब्राह्मण समाजाबद्दल अनेक प्रकारे नकारात्मकता पसरविणे, त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलण्याचे प्रमाण वाढत असून नुकतेच आमदार अमोल मिटकरी यांनीही अशाच प्रकारे व्यक्तव्य केले. यासाठी ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटीत होणे गरजेचे आहे. या माध्यमातून या वारंवार होणाऱ्या गोष्टींचा निषेध एकत्रितरीत्या करता येईल. समाजाने परंशुराम जयंती निमित्ताने आपली वेळी कार्यक्रमासाठी राखून ठेवून उत्सवाच्या माध्यमातून संघटीत व्हावे असे आवाहनही बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे समस्त समाजबांधवांना करण्यात आले आहे.

 

Exit mobile version