Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संविधान दिन ते प्रजासत्ताक दिनापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | भारतीय संविधानाप्रती तरुण पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संविधान दिन ते प्रजासत्ताक दिनापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुकुंद सपकाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

बुधवार, दि.२४ नोव्हेंबर रोजी संविधान जागर समिती जळगावच्या वतीने पत्रकार परीषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ” भारताने घटनात्मकदृष्ट्या राजकीय लोकशाही दिली. समाधान मिळाले परंतु राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत झालं नाही. आर्थिक लोकशाहीत झालं नाही मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, जातीय विषमता, प्रादेशिक विषमता वाढवण्याचं काम 1950 नंतर काही राजकीय पक्षांनी केलं आणि म्हणून सर्वांनी विचार करत स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाने जात, धर्म, लिंग विषमता दूर करून आपण भारतीय नागरिक आहोत ही भूमिका अंगीकारण्याचा सर्वांनी प्रयत्न करावेत अशा प्रकारचे आवाहन संविधान जागर समितीच्या वतीने करत आहोत आणि याच अनुषंगाने रॅली काढण्यात येणार आहे…” असे मुकुंद सोनवणे यांनी सांगितले

“विविध घटकांना न्याय, हक्क देण्यासाठी सरकार सत्तेवर असताना दुर्लक्ष करत असेल तर देशाचं काय होईल ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ज्या लोकांना संविधानाबद्दल माहिती नाहीये त्या लोकांना आपल्या हक्काबद्दल जागरूक करण्यासाठी रॅली काढण्यात येणार आहे असल्याचे सांगत शाळेमध्ये दिनांक 26 नोव्हेंबर सविधान दिन ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या कालावधीत परिसंवाद चर्चासत्रे, व्याख्याने आणि वादविवाद स्पर्धांचे आयोजन होणार आहे. शासनाने आखून दिलेले सर्व नियम पाळून जास्तीत जास्त लोकांनी संविधान रॅलीत सहभाग घ्यावा असे आवाहन संविधान जागर समितीच्या वतीने करीम सालार यांनी केला.

संविधान दिनाचे औचित्य साधून जनजागरण समिती जळगाव यांच्या विद्यमाने दिनांक दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता संविधान दिन उत्साहात संपन्न होणार आहे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. असे संविधान जागर समिती जळगावच्या वतीने पत्रकार परीषदेत सांगण्यात आले.

फेसबुक व्हिडीओ लिंक

Exit mobile version