Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी चुंचाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी, श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमीमध्ये गुरुपौर्णिमे निमित्त त्यांच्या शिष्यगण परिवारातर्फे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

चुंचाळे येथील वासुदेव बाबा,रघुनाथ बाबा,सुकनाथ बाबा यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी विविध गावाहून अनेक भाविक येत असतात. चुंचाळेसह परिसरातून वासुदेव बाबा यांचे शिष्यगण गुरु शिष्यातील नाते अखंडीत रहावे. या हेतूने गुरुपोर्णीमेचं पर्व साजरं करतात.

उद्या बुधवार, दि. १३ जुलै रोजी गुरु पौर्णिमेनिमित्त येथे यात्रोत्सव व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. वासुदेव बाबा मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. भाविकांच्या सेवेसाठी काही रिक्षाचालक भाविकांना मोफत मंदिरापर्यंत आणून सोडतात. श्री समर्थ वासुदेव बाबा मंदिराच्या सुशोभिकरणासह भाविकांच्या निवास्थानासाठी व्यवस्था करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. अनेक भाविक रघुनाथ बाबा, वासुदेव बाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात.

   

अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा –

पहाटे पाच वाजता मूर्ती अभिषेक, सहा वाजता मारुती अभिषेक, दुपारी साडेबाराला महाआरती, सायंकाळी सातला आरती, सकाळी आठपासून आरतीची वेळ सोडून भजन, भारुडे सुरू राहतील. दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावें असे आवाहन करण्यात आले आहे.

सायंकाळी पाच गावात वाजेपासून पालखी मिरवणूक निघेल. रात्री आठ वाजता दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल. शिरपूर येथील पायी दिंडीचे आगमन आज झाले त्यात तालुक्यातील नायगाव, किंनगाव, दहिगाव, सौखेडा, गिरडगाव, वाघोदा, मानवेल सकाळी या भागांतील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

Exit mobile version