Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाडळसरे येथे श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील ग्रामदैवत अंबिका मातेच्या चैत्रोत्सवानिमित्त चैत्र शुद्ध पंचमी 9 ते 16 एप्रिल या कालावधीत श्री राम नवमी व हनुमान जयंतीचे औचित्य साधून पाडळसरे येथे श्रीमद भागवत सप्ताह अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, सालाबादप्रमाणे चालू असलेला चैत्रोत्सव कोरोनामुळे बंद होता. मात्र या वर्षीही श्रीराम नवमी, हनुमान जयंतीचा योग साधून तालुक्यातील, पाडळसरे येथे चैत्रोत्सवाला सलग आठवडाभर धार्मिक कार्यक्रम अंबिका माता प्रतिष्ठाण व ग्रामस्थांनी आयोजित केले आहेत. त्यात पुरोहित रवींद्र काळे व निमचे लक्ष्मण महाराज यांनी तीन दिवस गणेश यागाचे पूजन पठण होमहवन करून पंचमीपासून देवी भागवत परायनाने चैत्रोत्सवाला प्रारंभ होऊन दि.९ एप्रिल पासून अखंड हरिनाम कीर्तन व श्रीमद भागवत संहिता पारायण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले असून दि. १६ रोजी हनुमान जयंतीला काल्याचा किर्तनाने महाप्रसाद वाटून सांगता होईल. ह.भ.प. स्वर्गीय डोंगर जी महाराज यांनी १९६१ पासून सुरू केलेल्या ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवाला सुरुवात केली आहे.

९ एप्रिल शनिवारी दुपारी 2 वाजता अंबिका मातेच्या मंदिराच्या नियोजित जागी विठ्ठल रुक्मिणी मूर्त्याची विधिवत पुरोहितांचे हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणार असून अंबिका मातेच्या मूर्तीचा अभिषेक करून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व चैत्रोत्सवाला सुरुवात होईल, दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती होऊन ७ ते ९ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व ९ते ११ भागवत पारायण होऊन दुपारी २:३० ते ५:३० भागवत कथा निरुपण तर सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ६ ते ६:३० सांज आरती होईल तर रात्री ८ ते १० या वेळी आळंदी येथील नामवंत कीर्तनकारांचे जाहीर कीर्तन होईल भागवत कथा निरुपण भागवताचार्य हभप नंदकिशोर महाराज लासुरकर हे भागवत संहिता पारायण करतील तर वेदमूर्ती हभप दिलीप पाठक शहादेकर देवी भागवत जप करतील त्यांना भजनाची साथ संगत हभप अंबालाल महाराज देतील, कीर्तन सप्ताहात यासाठी दिनांक ९ रोजी हभप बबन महाराज (पिंपळेसीमकर), दिनांक १० रोजी श्रीराम नवमीला हभप तुकाराम महाराज ( खोक्राळेकर ), दिनांक ११ रोजी हभप योगेश महाराज( वाघाडीकर ), दिनांक १२ रोजी हभप योगेश महाराज (वाघाडीकर ), दिनांक १३ रोजी हभप  शामसुंदर महाराज ( घोडगावकर ), दिनांक १४ रोजी मच्छिंद्र महाराज (वाडिभोकरकर ), दिनांक १५ रोजी दुपारी ४ वाजता ग्रंथाची व मूर्त्याची पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा होईल व रात्री हभप माधवराव महाराज ( धानोरेकर ) यांचे जागराचे कीर्तन व दिनांक १६ रोजी हनुमान जयंती निमित्त गजानन महाराज यांचे पहाटे ९ ते ११ या वेळेस काल्याचे  कीर्तन होऊन महाप्रसाद वाटप होऊन कीर्तन सप्ताहाची सांगता होईल तरी भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अंबिका माता प्रतिष्ठाण, पाडळसरे ग्रामस्थांनी व भजनी मंडळाने केले आहे.

 

Exit mobile version