Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाग्यश्री भिरूड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री कृष्ण कथेचे आयोजन

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सह्याद्री शिवभक्त सामाजिक संस्था’ महाराष्ट्र राज्य, शिवकन्या विभागाच्या अध्यक्ष भाग्यश्री प्रदीप भिरूड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये भागवत धर्माची पताका रोवण्यात अनेक संताचा अनमोल सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ संस्थापक आचार्य श्रीमद भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या शुभ आशीर्वादाने भुसावळ येथील भिरूड कॉलनीतील सोमवार, दि.२५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता कृष्ण कथा प्रसादम् या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘इस्कॉन’ भुसावळचे अध्यक्ष रसयात्रा दास वीस वर्षापासून कृष्ण सेवेत आहेत.  त्यांच्या मधूर वाणीतून भक्तीमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. यावेळी

‘हरे कृष्ण हरे कृष्ण; कृष्ण कृष्ण हरे हरे’,

‘हरे राम हरे राम; राम राम हरे हरे’

या हरिनाम कीर्तन जयघोषाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Exit mobile version