Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगावात संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन

यावल प्रतिनिधी | श्री दत्तात्रेय भगवान मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त किनगाव खुर्द येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.१२ ते १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताहाच्या दैनंदिन कार्येक्रमात पहाटे ५ ते ६ काकडा संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ८:३० ते १०:३० हरिकीर्तनाचा कार्येक्रम होणार असून दि.१२ व १८ रोजी सकाळी ८:३० ते ११ :३० व उर्वरीत दिवस दुपारी १:३० ते ६ यावेळात श्रीमद् भागवत कथा वाचन होणार आहे

दि.१८ रोजी पहाटे ५:३० वाजता दत्तजयंती महाअभिषेक होणार आहे तर संकिर्तन सप्ताहदरम्यान दि.१२ रोजी दिंडीसोहळा प्रमुख मुक्ताईनगर येथील ह.भ.प.रविंन्द्र महाराज, दि.१३ रोजी विदर्भरत्न रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज.पाचपोर, दि.१४ रोजी शिवचरीत्रकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बुलढाणा, दि.१५ रोजी जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे गादीपती ह.भ.प.धनराज महाराज,अंजाळेकर, दि.१६ रोजी भागवताचार्य ह.भ.प.भरत महाराज चौधरी म्हैसवाडी, दि.१७ रोजी भागवताचार्ये ह.भ.प.शाम महाराज, सौंदाणेकर, दि.१८ रोजी भागवताचार्ये ह.भ.प.देवगोपाल शास्रीजी महाराज, आडगाव तर दि.१९ रोजी वैराग्यमुर्ती ह.भ.प.पोपट महाराज.पाटील कासारखेडा यांचे सकाळी ९ ते ११ यावेळात काल्याचे किर्तन होणार आहे

या संकिर्तन सप्ताहदरम्यान गायणाचार्य म्हणून ह.भ.प.गजानन महाराज भोलाणेकर, ह.भ.प.मोहन महाराज सुरत व ह.भ.प.गणेश महाराज यांचे व मृदुंगाचार्ये म्हणून ह.भ.प.वामन महाराज धुपेश्वर संस्थान व ह.भ.प.प्रकाश महाराज किनगाव यांच्या सेवेचा लाभ मिळणार आहे तर व्याकरणाचार्ये शास्री भक्तिकिशोरदासजी हे संगीतमय श्रीमद् भागवत कथा वाचन करणार आहेत.

या कार्येक्रमाच्या प्रेरणास्थानी प्रभुस्वामी प्रेमप्रकाशदासजी तर १००८ आचार्ये राकेशप्रसाद महाराज, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज व सदगुरू शास्त्री धर्मप्रसाददास वडताल असणार आहे. दिंडी सोहळा दि.१८ रोजी दुपारी ३ वाजता तर महाप्रसाद दि.१९ रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू असणार आहे. खंडेराव मंदीरासमोर, ईचखेडा रोड, किनगाव खुर्द येथे आयोजित या संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिणाम संकिर्तन सप्ताहाचा भावीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version