धरणगावात उद्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेच्या वतीने भिल्ल समाजाचे सामुहिक विवाह सोहळ्याचे उद्या भव्य आयोजन केले आहे.

भारतीय समाजातील वैदिक विधी पद्धतीने आणि परंपरेनुसार पूर्णपणे गायत्री महायज्ञाने संपन्न होणार आहे.सदर विवाह सोहळ्यास 34 जोडप्यांची नोंदणी झाली असून एन. बी. कोटेक्स (कॉटन जिनींग)धरणगाव याठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी नऊ वाजेपासून पूजा विधीला सुरुवात होणार असून दुपारी १२ वाजून ३५  मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी संसारोपयोगी वस्तूंची भेट नवदाम्पत्यांना दिली जाणार आहे. या सोहळ्यास रामेश्वर येथील श्री नारायण स्वामी महाराज, महामंडलेश्वर 1008 ह.भ.प. भगवानदास जी महाराज धरणगाव व पाल येथील ह.भ.प. गोपाल महाराज यांचे आशीर्वचन लाभणार आहे.कार्यक्रमाला संघाचे विभाग संघचालक राजेश पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

यावेळी धरणगाव परिसरातील भिल्ल बांधव शहरातील नागरिक बंधू भगिनी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने राहणार आहे. विविध समित्यांच्या  माध्यमातून या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख सोमनाथ भील व संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे तसेच संजय सोनवणे महाराज, अरुण सोनवणे, यशवंत कुंवर, शिवदास  सोनवणे, प्रभाकर वाघ, सुखदेव सोनवणे, शांताराम जाधव यांच्या सह सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.

Protected Content