Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठी खुल्या ऑनलाईन गीतगायन स्पर्धेचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी | चित्तपावन स्नेहमंडळ जळगांव आयोजित, सरिता अभ्यंकर स्मृती मराठी खुल्या ऑनलाईन गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी खुल्या ऑनलाईन गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात वय वर्ष १० ते १५ व १६ ते ३२ अशा २ वयोगटात स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यासाठी गायलेल्या गीताचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मंगळवार, दि.२१ डिसेंबर २०२१ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाठवता येणार आहे.

यात दोन्ही गटांसाठी स्वतंत्र प्रथम पुरस्कार १,५०० रुपये, द्वितीय पुरस्कार १००० रुपये आणि दोन्ही गटात मिळून अजून उत्तम गायक आढळल्यास त्यास ५०० रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा निकाल २५ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात येणार असून आपला व्हिडिओ 9975969610 या व्हाट्सअप्प नंबरवर पाठवता येणार आहे.

यासाठी स्पर्धकाने व्हिडिओ करताना सुरुवातीला स्वतःचे नाव, जन्मतारीख, गाव व गाण्याची पहिली ओळ सांगणे आवश्यक असून यासाठी वाद्याची साथ आवश्यक असून तबला/पेटी किंवा कोणतेही वाद्य अथवा कराओके ट्रॅक वापरता येईल. गायनाचा अवधी ५ मिनीटापर्यंतचा असावा. यासह चित्रपट गीत, भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत, अभंग, देशभक्तीगीत, लावणी किंवा कोणताही प्रकारातील मराठी गीत स्पर्धेत गाण्यासाठी निवडता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. असे आयोजकांनी कळविले आहे.

Exit mobile version