पाचोऱ्यात संत निरंकारी समागमाचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व निरंकारी भक्तांतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही येत्या २२ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत शहरातील वरखेडी रोडवरील गुरूकुल इंग्लिश मेडियम स्कूल लगतच्या मैदानावर ४२ व्या समागमाचे आयोजन करण्यात आले.

पाचोरा येथे मेंबर इंचार्ज महाराष्ट्र संत निरकारी मंडळ दिल्ली चे प. आ. मोहन छाबडा यांचे अध्क्षतेखाली सायंकाळी ६ ते ९ या वेळेत निरंकारी भवन समोर जामनेर रोड पाचोरा येथे होत आहे. निरंकारी मंडळ अध्यात्मीक जाग्रुती बरोबर सामाजिक कार्यात्त देखील योगदान देत आहे. यात रक्तदान  शिबीराचे आयोजन, नशाबंदी, हुंडाबंदी, योगाभ्यास, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी योगदान तसेच वृक्ष लागवड आणि संवर्धन यासाठी वन नेस वन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मंडळाच्या कार्याची दखल घेतली जात आहे. यावेळी ईच्छुक भाविकांना ईश्वराची अनुभूति, देवाची ओळख करून देण्यासाठी ब्रह्मज्ञान प्रदान करण्यात येईल व अन्नदान होईल. या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थिती देवुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन धुळे झोन इन्चार्ज हिरालाल पाटील, तालुका अध्यक्ष महेश वाघ यांनी केले आहे.

Protected Content