Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मतदार यादीच्या पुनरिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी/तपासण्यासाठी उपलबध करुन देण्यात येणार आहे. तसेच या मतदार यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे. ज्यांचे वय 1 जानेवारी, 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण होत आहे. त्यांची नवीन मतदार म्हणुन तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांची नावनोंदणी करता येईल. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती  मतदार नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकित करण्यात येतील.

तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या विशेष ग्रामसभेत आपआपल्या गावांत सहभागी होवुन मतदार यादीतील नाव नोंदणी, नावाची दुरुस्ती तसेच आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

 

Exit mobile version