Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्जोद येथे रोग निदान शिबिराचे आयोजन

रावेर, प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या संसर्गात कशी काळजी घ्यावी असा संभ्रम नागरिकांमध्ये असून मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि भीती असल्याने कर्जोद येथे अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय आणि इकरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावासाठी रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात कोरोना योद्धे यांचा गौरव करून नागरिकांची तपासणी करून भीती कमी करण्यात आली.

शिबिराचे अध्यक्षस्थानी अ. करीम सालार हे होते तर उद्घाटन उप विभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपम अजलसोंडे, आरोग्य निरीक्षक महेमूद तडवी, सरपंच साकीना तडवी, केंद्र प्रमुख रईसोद्दिन अलाउद्दीन, श्रीराम फौन्डेशन सचिव दीपक नगरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अ. अजीज सालार यांनी केले. रुग्ण तपासणी कक्षाचे उद्घाटन अ.करीम सालार यांच्या हस्ते तर औषधालयाचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. थोरबोले यांनी सांगितले की, कोरोनाला आपण घाबरू नका त्याच्या सोबत आपल्याला जगायचे असून आपल्या घरातील संशयित रुग्णांना आपण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहचवून त्यांना उपचारासाठी संधी मिळवून द्या. करीम सालार यांच्यासंस्था जिल्ह्यात अत्यंत चांगले काम करीत असून अश्या प्रकारचे शिबीर गावोगावी होणे आवश्यक आहे. फैजपूर येथील कोविड सेंटर अत्यंत प्रभावी काम करीत असून आजपर्यंत सुमारे ५०० रुग्ण याठीकाणाहून बरे होऊन घेरी गेले आहेत. अभिमानाची बाब यात एकही रुग्ण दगावलेला नाही. सामाजिक संस्था आणि पदाधिकारी यांनी अशीच सेवा बजावून नागरिकांना समुपदेशन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. अ. करीम सालार यांनी सांगितले की, सर्व प्रथम आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहे. मालेगाव धर्तीवरील काढा आमची संस्था विकसित करण्यात येत असून लवकरच नागरिकांच्या सेवेत तो वितरीत करण्यात येईल. कोरोनाला आपण घाबरू नका केवळ काळजी घेवून आपली सुरक्षितता आपण निश्चित करू शकतो. नागरिकांना कुठलाही त्रास झाल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेकडे जाण्याचे देखील त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शे. शकील यांनी मानले. रुग्ण तपासणीसाठी डॉ. हनीफ शेख, डॉ. अनुपम अजलसोंडे, सोहेब शेख, डॉ. जावेद देशमुख, डॉ. अशफाक कादर, डॉ. अमीर सालार, डॉ. मुजीब पिंजारी, डॉ. अब्दुल वहाब, डॉ. अनिल पाटील यांचेसह सहकारी यांनी तपासणी केली. यशस्वीतेसाठी शफीउद्दीन शेख, मनोज पाठक यांनी कामकाज पहिले.

Exit mobile version