Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवतीर्थ मैदानात राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने जळगाव जिल्हा राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व  महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी सैनिक किरण महाजन आणि मयूर वाघमारे यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आले.

आयोजित रक्तदान शिबीरात महिला व पुरूषांनी सहभाग नोंदविला होता. १७३ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  जळगाव जिल्हा राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व  महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी जाधव, सागर कांबळे, टायगर ग्रुप खानदेश विभाग अध्यक्ष  ऋषिकेश भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानदेश टायगर ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आहे. 

रक्तदान शिबिर रेड प्लस ब्लड बँक यांच्या सौजन्याने आयोजित केले गेले.

याप्रसंगी डॉ. भरत गायकवाड, डॉ. एम. देशपांडे, डॉ. एम पटेल, आयोजक विवेक महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सपकाळ, लखन वालेचा, राकेश महाजन, टायगर ग्रुपचे जळगाव जिल्हा सामाजिक कार्यकर्ते  गौरव उमप, सोपान मानकर, अजय घूघे,  दिपक गायकवाड, किरण चौधरी, मनोज बाविस्कर, कुणाल बारी, जितू निंबाळकर, रवींद्र पाटील, विशाल काकडे, राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष मयूर बारी, प्रदीप सोनार, हेमंत वडनेरे यांची उपस्थिती होती, रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यांना सारा हॉस्पिटल, लखन वालेचा, प्रकाश सपकाळ , विवेक महाजन यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांचे टी-शर्ट वाटप करण्यात आले.

 

Exit mobile version