Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात आज निषेध सभेचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमळनेरात निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

पुलवामा येथील भ्याड हल्यात ४२ भारतीय शूर जवान शहीद झाले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि भारतीय जवानांना बळ देण्यासाठी 15 रोजी सायंकाळी 6 वाजता जि प विश्रामगृह , अमळनेर येथे सामुदायिक वीरांजली अर्पण करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजर रहावे आणि येताना स्वतःची एक मेणबत्ती आणावी,असे आवाहन अध्यक्ष ,शहर व तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष, अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, अध्यक्ष अमळनेर तालुका क्रीडा संघटना तसेच शहर व तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय , सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते अमळनेर यांनी केले आहे.

Exit mobile version