सावद्यात कायदेविषयक जागृती शिबिरासह फिरत्या लोक अदालतीचे आयोजन

सावदा, ता. यावल लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शासकीय विश्राम गृह, सावदा परिसरात तालुका विधी सेवा समिती, रावेरमार्फत ‘बाल कामगार व मोटार वाहन कायदा’ या विषयांवर कायदेविषयक शिबीर तसेच मोबाइल व्हॅन फिरते लोक-अदालतीचे आयोजन करण्यात आले.

सोमवार, दि. १३ जून रोजी संपन्न झालेल्या सादर लोकदलातीत १३८ च्या २ केसेस मोटार, वाहन कायद्याअंतर्गत एकूण १८ केसेस आणि कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत ३ केसेसचा निपटारा करण्यात आला. त्यातून एकूण १० हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.

शिबिराचे अध्यक्ष न्या.प्रवीण पी. यादव हे होते. यावेळी शिबिराला रावेर तालुक्याचे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची उपस्थित होती. शिबिराचे सूत्रसंचालन अॅड. शीतलकुमार जोशी, अनुमोदन अॅड. प्रमोद विचवे, कार्यक्रमाची रूपरेषा अॅड. एस. बी. सांगळे, मोटार वाहन कायद्यावर अॅड. प्रमोद विचवे यांनी तर बालकामगार या विषयावर अॅड. धनराज पाटील यांनी मार्गदर्शन केले.

फिरते लोक-अदालतीचे पंच न्यायाधीश म्हणून न्या. प्रवीण यादव तसेच पंच सदस्य म्हणून अॅड. मेघनाथ चौधरी हे होते. सदर शिबीर व लोक अदालतीसाठी सावदा पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी डी. डी. इंगोले तसेच समाधान गायकवाड रावेर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. बी. सांगळे, सचिव अॅड. प्रमोद विचवे, उपाध्यक्ष अॅड. शीतलकुमार जोशी, अॅड. धनराज ई. पाटील, अॅड. राकेश पाटील, अॅड. संदीप मेढे, अॅड. एस. एम. सोनार, अॅड. तुषार पी. चौधरी, PLV. सुनीता दरेकर, वर्षा पाटील, दयाराम नामदेव मानकरे, बाळकृष्ण पाटील, राजेंद्र अटकाळे, न्यायालयीन कर्मचारी सहा.अधि.सुगंधीवाले, स्टेनो मनोहर शिंपी, लिपिक डी. जी. इंगळे, बी. के. तडवी, राहुल सोनावणे, भरत बारी, दिनेश साळी, भगवान पाटील, सतिष रावते, किशोर तुळशीराम पाटील इ. चा सहभाग आणि सहकार्य लाभले.

 

Protected Content