Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Health Camp : यावलमध्ये भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचं आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

शुक्रवार, दि. २२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते सायंकाळच्या ५ वाजेदरम्यान यावल येथील ग्रामीण रुग्णालयात या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी डिजीटल हेल्थ आय.डी.(युनिक हेल्थ आय.डी.), आयुष्यमान भारत कार्ड, सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहे.

यासाठी आवश्यक कागदपत्रे –

पासपोर्ट साईज दोन फोटो

केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड

आधार कार्ड

मतदान ओळखपत्र

मुळ कागदपत्र

सोबत झेरॉक्स प्रत्येकी दोन प्रती

विशेष तज्ञ डॉक्टरांमार्फत सर्व रोगांची मोफत तपासणी –

हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री तपासणी, लहान मुलांचे आजार, किडणी आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कान-नाक, आजार, अस्थिरोग, एच.आर.व्ही.तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कृष्ठरोग आदी. सर्व आजाराची तपासणी करण्यात येणार आहे.

मोफत रक्त, लघवी, एक्स-रे व ई.सी.जी. गरजू रूग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत दिल्या जातील.

आयुर्वेद विभाग अंतर्गत मोफत तपासणी तसेच निरोगी जीवनशैली विषयी आहार,योगा व इतर सल्ला आणि मार्गदर्शन मिळणार असून किशोर वयातील मुला-मुलींसाठी, कुमार अवस्थेतील बालकाच्या समस्या या विषयी सल्ला व मार्गदर्शनदेखील देण्यात येणार आहे.

विशेष बाब –

या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदान शिबीर तसेच नेत्रदान, अवयवदान, देहदान संबंधी स्वयं इच्छापत्र भरून घेतले जाणार आहेत.

प्रमुख उपस्थिती –

या मेळाव्यास मा.पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीषदादा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, यावलच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभणार आहे.

मोफत आरोग्य मेळाव्याचां मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन जळगाव जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.किरण पाटील आणि यावल वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी केलं आहे.

Exit mobile version