Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहिगाव येथे श्री शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील दहिगाव येथील श्री महादेव व हनुमान मंदिरा समोरील प्रांगणात गुरूवारी ७ सप्टेंबर २३ बुधवार पासून शिवपुराण कथा सप्ताह सुरुवात होत आहे. याची सांगता १३ सप्टेंबर रोजी होणार आहे भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले  आहे.

यावल तालुक्यातील दहीगाव येथे गुरूवार ७ सप्टेंबरपासून श्री महादेव व हनुमान मंदिरा समोर श्रावण मासा निमित्ताने दिलीप महाराज, वृंदावन धाम जळगावकर यांचे अमृतवाणीतून शिवपुराण कथा प्रबोधन केले जाणार आहे. या शिवपुराण कथेचा समारोप १३ सप्टेंबर बुधवार रोजी होणार आहे. कथा सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. त्याच प्रमाणे दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ वाजता काकड आरती व सायंकाळी ५ वाजता हरिपाठ वाचन होणार आहे. या सप्ताहात भाविकांनी कथा श्रावण करण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त दहिगावच्या ग्रामस्थांनी केले आहे. कथा सप्ताहासाठी गावातील कृष्णा पितांबर पाटील यांच्या कुटुंबाने विशेष सहकार्य केले आहे. तरी या शिवपुराण कथा सप्ताहचे लाभ पंचक्रोशितील भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Exit mobile version