Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस मुख्यालयात तक्रार निवारण दिनाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस दलातर्फे दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नागरीकांच्या पोलीस ठाण्याशी संबंधित व इतर तक्रार निवारण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, नागरीकांनी तक्रार निवारण दिनात आपल्या तक्रारी सादर करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी केले आहे.

Exit mobile version