Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया महाशिबीराचे आयोजन

मंगळग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मंगळग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिबिरासाठी नावनोंदणी श्री मंगळग्रह मंदिर येथे २३ आॅक्टोबर २०२३ पर्यंत रोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत होईल. सदर शिबिरात फक्त मोतीबिंदू आहे किंवा नाही याबाबतच मोफत तपासणी होईल.  चष्म्यांचे नंबर काढून मिळणार नाहीत. त्यासाठी कृपया कोणीही येऊ नये.  ज्या शिबिरार्थींची मोतीबिंदू शस्त्रक्रिया (आॅपरेशन) करावे लागेल त्यांना शिबीरस्थळीच शस्त्रक्रियेची तारीख कळविली जाईल.  ज्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावयाची आहे. त्या व्यक्तीसह त्यांच्यासोबत येणाºया व्यक्तीलाही गोदावरी फाऊंडेशन, जळगाव येथे नेण्याची तसेच तेथे भोजनाची व्यवस्था मोफत केली जाईल. गोदावरी फाऊंडेशन, जळगाव येथून मात्र स्वखर्चाने परत यावे लागेल. एखाद्या रुग्णाला उच्च रक्तदाब, शुगर किंवा अन्य काही त्रास झाल्यास त्यांना गोदावरी हॉस्पिटल, जळगाव येथेच मोफत उपचारार्थ एक दिवस ठेवले जाईल.

 

शिबिराचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड व आधार कार्ड सोबत आणावे. कोणतेही कार्ड नसेल तरी शिबिराचा लाभ मिळेलच.  शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ व गोदावरी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

 

Exit mobile version