Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे ‘कलमिनेटींग इव्हेंट’चे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूल भुसावळ येथे आज २९ ऑगस्ट रोजी ‘फुट प्रिंट्स’ या विषयांतर्गत ‘कलमिनेटींग इव्हेंट’चे आयोजन करण्यात आले होते. या इवेंट अंतर्गत शाळेतील विध्यार्थ्यांनी स्टोन एज व मॉडर्न एज र आधारित क्लासरूम सजविले.

या कार्यक्रमात विद्यार्थांनी मोहंजोदाडो संस्कृती, हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती,इजिप्तची संस्कृती, माया संस्कृती व वेगवेगळ्या संस्कृतीचा व युगाचा पेहराव केला होता. तसेच या संस्कृतीतील शिल्प, वास्तुशिल्प यांचे प्रतिकृती तयार केल्या. विद्यार्थांनी कार्यक्रमास आर्वजुन उपस्थित पालकांना विविध संस्कृतीबद्दल माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संस्कृतीवर आधारित नृत्यकला सादर केली. पालकांसाठी मनोराजनात्मक विविध खेळ ठेवण्यात आले.

पोदार इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य श्रीयुत आनंद हिरालाल शाह यांच्या उपस्थितीत पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात शाळेचे व्यवस्थापक रामदास कुळकर्णी, पोदार जम्बो किड्सचे मुख्याध्यापिका मनीषा शृंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शाळेतील विविध समाजसुधारकांच्या चित्रांनी सजवलेला रिसेप्शन एरीया ठरला.

Exit mobile version