Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘कृषिधन’ कृषिप्रदर्शनानिमित्त सेंद्रिय शेती मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन

फैजपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर- रावेर-यावल परिसराचे लोकप्रिय आमदार शिरिष चौधरी  यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली ‘ कृषिधन’ कृषिप्रदर्शनाचे आयोजन हे सातपुडा विकास मंडळ, पाल संचालित कृषी विज्ञान केंद्र पाल ता. रावेर जि. जळगाव यांच्या मार्फत दिनांक ०५ ते ०८ जानेवारी, २०२४ या कालावधीत मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, फैजपूर च्या बाजूला आयोजित करण्यात येत आहे.

‘कृषिधन’ कृषिप्रदर्शना निमित्त सेंद्रिय शेती मॅरेथॉन स्पर्धा २०२४ चे आयोजन हे शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीची जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकास अनुक्रमे ११११/- प्रथम बक्षीस, ७५१/- द्वितीय बक्षीस, ५५१/- तृतीय बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. https:forms.gle/ZKGRPXizxhA91wuC7 या लिंकवर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन पाल संस्थेचे सचिव . अजित पाटील यांनी केले.

मॅरेथॉन स्पर्धा ०५ जानेवारी, २०२४ रोजी पुरुषांसाठी ०५ किलोमीटर आणि ०३ किलोमीटर महिलांसाठी अंतर असणार आहे. स्पर्धा दुपारी १२:०० वाजता  ‘कृषिधन’ कृषिप्रदर्श पासून होणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा आणि स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी प्रा. महेश महाजन – ९९७०६६१५४६ यांना किंवा प्रा. गोविंद मारतळे -९६३७१०५७५७ यांच्याशी संपर्क साधावा.  स्पर्धा उद्घाटनाचे अध्यक्ष रावेर-यावल परिसराचे लोकप्रिय आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते होणार आहे तरी इच्छुकांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Exit mobile version