Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरुग्ण शोध अभियानाचे आयोजन

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाने प्रगती योजनेत राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन व क्षयरोग कार्यक्रमाचा समावेश केला असुन या अंतर्गत जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार चाळीसगाव तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संयुक्त कृष्ठरोग शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

या शोधमोहिमेत जनजागृती च्या माध्यमातुन समाजात दडुन असलेले नविन टीबी व कृष्ठरुग्ण शोधुन त्यांना तात्काळ उपचार सुरु करुन रोगप्रसाराला आळा घालणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

या शोध मोहिमेत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात 13 ते 30 सप्टेंबर, 2022 च्या कालावधीत आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांची टीम मार्फत प्रत्येक घरोघरी जावुन टीबी व कुष्ठरोगाबाबत माहिती देवून प्रत्येक घरातील सर्व सदस्यांची शारीरीक तपासणी करण्यात येत आहे. या सर्व शोधलेल्या संशयीत रुग्णांची तपासणी वैदयकिय अधिकारी यांचे मार्फत तपासणी प्राथमिक आरोगय केंद्र स्तरावर करण्यात येणार आहे. तपासणी नंतर निदान झालेल्या टीबी व कुष्ठरोग बाधित रुग्णास तात्काळ उपचार दिले जाणार आहेत या मोहिमेमुळे रोगप्रसाराला आळा असण्यास मोठया प्रमाणात मदत होईल असा विश्वास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नागरीकांनी घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करुन तपासणी करुन घ्यावी, या शोध मोहिमे करीता ग्रामीण भागात 310 व शहरी भागात 23 टीम प्रत्येक गाव निहाय कार्यरत करण्यात आल्या आहेत. या करीता 333 आशा स्वयंसेविका व 333 पुरुष स्वयंसेवकां मार्फत 14 दिवस घरोघरी जावुन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येईल 67 पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यातील 22 वैदयकिय अधिकारी मोहिमेतील संशयीत रुग्णांची तपासणी करुन निदान करणार आहेत.

हि मोहिम यशस्वी होणेसाठी तालुका स्तरावरुन आरोग्य विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे, आरोग्य सहाय्य्क ममराज राठोड व बीएनओ शिनकर मॅडम, तालुका स्वप्नील पाटील, कृष्ठरो तंत्रज्ञ हमीद पठाण , धनंजय जाधव तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अवैदयकिय सहाय्यक अहिरराव, कैलास ठाकरे, चौधरी व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैदयकीय अधिकारी सर्व आरोग्‍य कर्मचारी व आशा स्वयंसेविका / स्वयंसेवक/ अंगणवाडी सेविका इत्यादी विशेष परिश्रम घेत आहेत. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव डॉ देवराम लांडे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version