Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे शिवभक्त परिवाराच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात पवित्र श्रावणमासा निमित्त, समस्त शिव भक्तगण परिवारातर्फे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कावड यात्रेत अनेक तरूण भक्तांनी आपला सहभाग नोंदविला.

आज रविवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. श्री.अर्जुनेश्वर महादेव मंदिर अंजाळे तालुका यावल येथील मोर नदी व तापी नदीच्या संगमावरून कावड यात्रेंकडून पवित्र नदीचे पाणी घेण्यात आले. अर्जुनेश्वर महादेव येथून पायी शोभा यात्रेद्वारे शहरातील तारकेश्वर महादेव मंदिरात येवून जलाभिषेक करण्यात आला.

या कावड यात्रेसाठी शहरातील प्रसिद्ध डॉ.कुंदन फेगडे यांनी कावडधारींना मेडिसीन उपलब्ध करून दिली व फैजपूर शहरातील शिवभक्त विकी जैस्वाल यांनी कावड समारोपला प्रसादाचे वितरण केले. शहरातील काही शिव भक्तांनी चहा पाण्याची व्यवस्था केली. कावड यात्रेला शहरातील धिरज बडगुजर याने साऊण्ड सिस्टीम ची व्यवस्था केली.                        

मुकेश बारी व प्रतिक बारी तसेच शहरातील फोटोग्राफर भिकन महाजन यांनी कावड यात्रेसाठी फोटोशुट केले. कावड यात्रेचे पौराहित्य शहरातील अथर्व बयानी गुरुजी यांनी केले. या कावड यात्रेत, तारकेश्वर मंदिततील पुजारी अमृत महाराज, सोमा महाराज, बाळु महाराज,  पांडुरंग महाराज शिवभक्त पारिवार उपस्थित होते.

यामध्ये आयोजक समस्त शिव भक्त पारिवारातून  महेश भाऊ खाचणे, जुगल  घारु, सागर लोहार,  हर्षल मोरे, कमलेश शिर्के, प्राची पाठक, गिरीष फेगडे, सुभाष फेगडे, सागर पाठक, विशाल भिल, धनराज, योगेश वाणी,  पंकज पाटील, सुनिल गायकवाड, उज्वल कानडे, स्नेहल फिरके, समाधान दुबले,  प्रवीण बारी,  योगेश देशमुख, दिपक बारी, हर्षवर्धन भोईटे, शुभम देवरे, गौरव काटकर,  देवा महाले, मयूर महाजन, ऋषी माळी समस्त शिव भक्त परिवार उपस्थित होते.

Exit mobile version